
फुलंब्री : तालुक्यातील किनगाव परिसरात गट क्रमांक ४११ मध्ये अवैधरीत्या मुरुमाचा उपसाप्रकरणी पोकलेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरोधात फुलंब्री पोलिसांत बुधवारी (ता. १३) रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.