Sand Mining Scam in Aurangabad District : गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातून वॉटरग्रीड योजनेसाठी जास्त वाळू उपसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ₹४० कोटी दंडाची कारवाई होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : वॉटरग्रीड व जल जीवन मिशन योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजीपीला) गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातील सनव या राखीव वाळू घाटातून अधिकची वाळू उपसली आहे. यामुळे एमजीपीला ४० कोटींचा दंड लावण्यात येणार आहे.