वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे,इम्तियाज जलीलांची सरकारवर टीका | Imtiaz Jaleel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel
वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे,इम्तियाज जलीलांची सरकारवर टीका

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे,इम्तियाज जलीलांची सरकारवर टीका

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत एमआयएम (AIMIM) पक्षाची तिरंगा रॅली (Tiranga Rally) होणार होती. मात्र त्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. याबाबत खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकारने स्पष्टीकरण देऊ शकेल का?, असा सवाल जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, या राज्यात वेगवेगळ्या लोकांना वेगळे कायदे आहेत का? (Aurangabad)

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे पोलिस महासंचालकांना टॅग करित त्यांना उत्तर देण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. एमआयएमच्या तिरंगा रॅलीची आगामी तारीख लवकरच सांगितली जाईल. अन्यायाविरुद्ध लढा सुरुच राहिल असे त्यांनी सांगितले.

loading image
go to top