पैसे देतील त्यांच्याकडे ते पळतील, जलीलांची औरंगाबादच्या शिवसेना आमदारांवर टीका

'सर्व पैशाचा धंदा असून जे पैसे देतील त्यांच्याकडे ते लोक पळतील'
Imtiaz Jaleel, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Pradip Jaiswal, Sanjay Shirsath, Ramesh Bornare
Imtiaz Jaleel, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Pradip Jaiswal, Sanjay Shirsath, Ramesh Bornareesakal

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना आज वेग आला आहे. सूरतहून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंसह आमदार गुवाहाटीला हलवण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बंडखोरीत औरंगाबादचे (Aurangabad) पाच आमदारांचा समावेश आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Imtiaz Jaleel Attacks On Revolt Shiv Sena MLAs Of Aurangabad)

Imtiaz Jaleel, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Pradip Jaiswal, Sanjay Shirsath, Ramesh Bornare
देश तरुणांना रोजगार देऊ शकत नाही, मोदींच्या धोरणांवर राहुल गांधींची टीका

आमदारांना फक्त पैसे पाहिजे, जे त्यांना पैसे देतील त्यांच्या मागे ते पळतात, अशी टीका त्यांनी औरंगाबादच्या आमदारांवर केला. तुम्हाला मंत्री केले. नंतर तुम्हाला अजून काय पाहिजे होते. त्यामुळे हिंदुत्वाच्या फक्त गप्पा मारल्या जात असल्याची टीका त्यांनी आमदारांवर केली. हा सर्व पैशाचा धंदा असून जे पैसे देतील त्यांच्याकडे ते लोक पळतील, असे इम्तियाज जलील म्हणाले.

Imtiaz Jaleel, Abdul Sattar, Sandipan Bhumre, Pradip Jaiswal, Sanjay Shirsath, Ramesh Bornare
सैनिकांनी चौकीदार व्हावे ही पंतप्रधान मोदींची इच्छा : असदुद्दीन ओवैसी

मराठवाड्यातील या आमदारांची बंडखोरी

पैठणचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबादचे पश्चिमचे संजय शिरसाट, औरंगाबाद मध्यचे प्रदीप जैस्वाल, वैजापूरचे रमेश बोरनारे, परंड्याचे तानाजी सावंत, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, नांदेड उत्तरचे बालाजी कल्याणकर यांनी बंडखोर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com