
छत्रपती संभाजीनगर : आयुष्यात मी पाहिलेली ही सर्वांत भ्रष्ट निवडणूक होती. एमआयएम दोन वेळा हरलेल्या पूर्व मतदारसंघात विद्यमान सत्तेतील मंत्र्यांचे आव्हान होते. ते स्वीकारून मी लढलो. ते जिंकले अन् मी हरलो असलो तरी एमआयएमने बरोबरीने मते घेतली. या सर्व डावपेचात खऱ्या अर्थाने मी हरून जिंकलो.