
...त्यांना लांबूनच ईदच्या शुभेच्छा ! इम्तियाज जलील यांची राज ठाकरेंवर टीका
औरंगाबाद : शिरखुर्म्यासाठी बोलवण्याची लायकी त्यांची राहिलेले नाहीत. आम्ही पहिल्यांदा त्यांना प्रेमाने बोलवले होते. मात्र त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, त्यामुळे त्यांनी कुठेही जागा शिल्लक ठेवलेली नाही. त्यामुळे त्यांना लांबूनच ईदच्या शुभेच्छा !, असा टोला खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लगावला. आज मंगळवारी (ता.तीन) ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी तर सर्वप्रथम औरंगाबादच्या पोलिसांना मनापासून धन्यवाद करतो. औरंगाबादच्या (Aurangabad) आत असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता, की औरंगाबादमध्ये काही तर होईल. (Imtiaz Jaleel Criticize Raj Thackeray Over Sabha In Aurangabad)
हेही वाचा: राज ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत जमीर काझी यांचा राजीनामा
येथील वातावरण खराब होईल. मात्र येथील सर्व हिंदू-मुस्लिम जनतेबरोबर आमच्या दलित बांधवांसह पोलिसांचेही मनापासून आभार मानतो. जेव्हा आपण टीम म्हणून काम करतो तेव्हा शहराच्या आत कोणतीही घटना होऊ देणार नाही. त्याचाच परिणाम आहे, की आज संपूर्ण देशाची नजर औरंगाबादवर होती.
हेही वाचा: Ajit Pawar, Sanjay Raut Reactions on Raj : अल्टिमेटमवर ठाकरे-राऊत-पवार काय म्हणालेत?
औरंगाबादमध्ये स्थिती काय असेल? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पोलिसांनी आपले काम चांगल्या प्रकारे केले. जनतेनेही चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पाडली. त्यामुळेच औरंगाबादमध्ये शांततापूर्ण वातावरण राहिले आहे, असे जलील म्हणाले.
Web Title: Imtiaz Jaleel Criticize Raj Thackeray Over Sabha In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..