खासदार इम्तियाज जलील यांचा लाॅकडाऊनला विरोध; ३१ मार्चला काढणार मोर्चा, नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel News

औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून सरकारला कोरोना आटोक्यात आणता आला नाही. आणि यातच लॉकडाऊन करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत आहे. लोक कोरोनामुळे मरत नसून सरकारतर्फे दाखवण्यात येणाऱ्या आकडेवारीला भयभीत होऊन  मरत  आहेत, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
सरकारच्या  लॉकडाऊनच्या धोरणाविरोधात आता रस्त्यावर उतरणार असून  ३१ मार्चला पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान मोर्चा काढणार असल्याची माहिती श्री. जलील यांनी रविवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली.

श्री. जलील म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने काल लॉकडाऊनचे परिपत्रक काढले. यात काही गोष्टी सुरू ठेवणार असे सांगितले. मात्र यात उद्योगांना सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन करायचे, तर उद्योग ही बंद करायला करावेत.  कारण की त्यांच्याकडे काम करणारे दोन लाख कामगारांच्या ही जीवन मरणाचा प्रश्न आहे. फक्त कंपनी मालक जाऊन चालणार नाही तर कामगार जगला पाहिजेत असेही ते म्हणाले. ३१ मार्चला निघणाऱ्या मोर्चामध्ये रिक्षा, उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार, छोटे- मोठे हॉटेल व्यावसायिक, हातगाडी चालक, फळविक्रेते, व्यापारी सर्व पक्षातील  नेतेमंडळी कार्यकर्ते  ही  रस्त्यावर उतरावे. कारण हा मोर्चा तुमच्यासाठी आहे.असेही  खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

सर्वांनी सामील व्हा मोर्चात
औरंगाबादचे खासदार या नात्याने जिल्ह्याची जबाबदारी घेता सर्व धर्माच्या लोकांना विनंती करतो की ३१ मार्चला या मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन खासदार जलील यांनी केले. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या दोन हजार 438  जागा रिक्त आहेत. घाटी रुग्णालयात बेड्स कमी पडत असले तर खासगी रुग्णालयात ताब्यात घ्यावे. कारण की आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासनाला कोणत्याही खासगी अथवा सरकारी आस्थापना ताब्यात घेता येतात. त्यामुळे घाटीवर ताण कमी होत असेल तर या कायद्याअंतर्गत खासगी रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी विनंती खासदार जलील यांनी केली आहे.

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com