केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याने OBC वर अन्याय : इम्तियाज जलील

आम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतोय.
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleelesakal

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याने ओबीसींवर केवळ अन्याय झाला आहे. आम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतोय, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी व्यक्त केले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे ओबीसी आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळली आहे. यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाने दिला आहे. त्यावर जलील यांनी मत व्यक्त केले आहे.(Imtiaz Jaleel Said, Injustice On OBC Due To Central And State Government)

Imtiaz Jaleel
Omicron : चिंता वाढली! उस्मानाबादेत ओमिक्राॅनचे दोन रुग्ण,प्रशासन सतर्क

पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, जर ५० टक्के लोकसंख्येला आरक्षण दिले जाणार नसेल तर आता १० टक्के लोक १०० जागा लढवतील. हे अवनतीचा मार्ग ठरेल. राजकीय सक्षमीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मागास समाजासाठी महत्त्वाच्या असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com