esakal | लॉकडाउनवरून खैरे-जलील यांच्यात जुंपली; मुख्यमंत्र्यांचा आदेश नाकाराल तर...
sakal

बोलून बातमी शोधा

khaire and jaleel

खैरे-जलील यांच्यात जुंपली; मुख्यमंत्र्यांचा आदेश नाकाराल तर...

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार (covid 19) मागील काही दिवसांत कमी होताना दिसत आहे. राज्यातील व्यापारी १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहेत. आता मुंबई, पुण्यापाठोपाठ खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी औरंगाबादमध्ये १ जूननंतर दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला आहे. यावर 'लॉकडाउन उघडणारे इम्तियाज जलील कोण?' असा प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी केला आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, 'कोणत्याही परिस्थितीत आता लॉकडाउन (lockdown) शिथील करण्याची गरज असल्याचे औरंगाबादची जनता मागणी करत आहे. लोकांनी लॉकडाउनला सहयोग केला याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. लोकांनी व्यवस्थित नियम पाळले म्हणून जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली आहे.'

हेही वाचा: मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक

यावर प्रत्यूत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी खा. जलील यांच्या मागणीला विरोध केला. खैरे म्हणाले, मुद्दाम दादागिरी करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न खा. जलील करत आहेत. मुख्यमंत्री जो आदेश देतील तो आपल्याला पाळायला पाहिजे. आम्ही तर शिवसैनिक आहोत आम्ही आज्ञाधारक असून मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार. १ जूनला जर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला विरोध केला तर आम्ही तुम्हाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरू'