esakal | मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

मराठवाड्यातील रुग्णसंख्या घटतेय पण बीडमधील परिस्थिती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: मराठवाड्यात मंगळवारी (ता. २५) दिवसभरात २ हजार ७२७ कोरोनाबाधित (covid 19 infection) आढळले. यामध्ये बीडमध्ये ७४९, परभणी ४६२, उस्मानाबाद ४०९, औरंगाबाद ३९६, जालना २३२, लातूर २१२, नांदेड २०५, हिंगोली ६२ रुग्ण वाढले आहेत. मराठवाड्यातील जिल्ह्यांचा विचार केला तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णवाढ (Beed corona updates) असल्याचे दिसते.

तसेच मागील २४ तासांत मराठवाड्यात उपचारादरम्यान आणखी ८३ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये २२, बीड १८, औरंगाबाद १४, जालना १३, उस्मानाबाद ८, नांदेड- हिंगोलीत प्रत्येकी तीन तर परभणीतील दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा: 'पारो'च्या समाधीची पडझड; स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने झटकले हात

औरंगाबाद जिल्ह्यात १४ जणांचा मृत्यू झाला. कायगाव, गंगापूर येथील पुरुष (वय ४५), बजाजनगरातील पुरुष (५३), मुकुंदवाडीतील पुरुष (६२), उत्तमनगर, जवाहर कॉलनीतील पुरुष (६१), देवळाई रोड येथील पुरुष (८५), बजाजनगरातील पुरुष (८३), मंगेगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (३०), साफेर (ता. वैजापूर) येथील महिला (४३), त्रिवेणीनगरातील पुरुषाचा (५१) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. मयूर पार्क भागातील पुरुषाचा (६०) जिल्हा रग्णालयात तर बिडकीन (ता. पैठण) येथील पुरुष (६३), करंजखेडा (ता. कन्नड) येथील महिला (७१), सादात कॉलनीतील पुरुष (७२), जटवाडा रोड भागातील महिलेचा (५२) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
जिल्ह्यातील मृतांची संख्‍या ३ हजार १०६ झाली आहे. (covid 19 marathwada updates beed)

औरंगाबादेत ३९६ बाधित, १४ मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात ३९६ कोरोनाबाधितांची भर पडली. यात शहरातील १५२ तर ग्रामीण भागातील २४४ रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार १३३ वर पोचली आहे. आज आणखी ६५४ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील २००, ग्रामीण भागातील ४५४ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार १५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५ हजार १२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.