esakal | दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

बोलून बातमी शोधा

null

मराठवाड्यात सोमवारीही (ता. ३) कोरोना रुग्णसंख्येत घट दिसली. विशेषतः औरंगाबाद, नांदेडमध्ये ही संख्या कमी होताना दिसत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

दिलासादायक! औरंगाबाद येथील रुग्णसंख्येत आणखी घट

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सोमवारीही (ता. ३) कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट दिसली. विशेषतः औरंगाबाद, नांदेडमध्ये ही संख्या कमी होताना दिसत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मराठवाड्यात दिवसभरात ६ हजार ६४९ बाधित आढळले. (In Aurangabad the number of corona patients is declining)

जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी

बीड १२५६, लातूर १०२७, परभणी ९१७, जालना ८९८, उस्मानाबाद ८१४, औरंगाबाद ८०१, नांदेड ७०२, हिंगोली २३४. मराठवाड्यात सोमवारी सहा हजार ३१५ रुग्ण आढळले होते. त्यात औरंगाबादमधील ८३५ जणांचा समावेश होता.

उपचारादरम्यान, १३५ जणांचा मृत्यू झाला. त्यात लातुरमध्ये ३७, औरंगाबाद ३१, नांदेड २५, उस्मानाबाद १३, परभणी- बीडमध्ये प्रत्येकी ११, जालना ५, हिंगोलीतील दोघांचा समावेश आहे. सोमवारी मराठवाड्यात १२१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

हेही वाचा: कोरोना तपासण्यांची संख्या वाढवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

जिल्ह्यात आज ३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची संख्या २ हजार ५८८ वर गेली आहे. कन्नड येथील पुरुष (वय ४०), जेहूर (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (५२), कन्नडमधील पुरुष (५५), वैजापुरातील पुरुष (३५), सेलूड लाडसावंगी येथील पुरुष (७०), वैजापुरातील महिला (७०), गोळटगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (६०), बोरगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (४८), गांधेश्‍वर (ता. खुलताबाद) येथील महिला (७५), फुलंब्री येथील महिला (८०), चितेगाव येथील पुरुष (४५), पैठणमधील महिला (७७), रामनगरातील पुरुष (३६), भावसिंगपूरा भागातील महिला (६५), वैजापुरातील पुरुष (७२), सिल्लोड येथील पुरुष (७२), कन्नडमधील पुरुष (७३), खंडाळा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (६८), कन्नडमधील पुरुष (६८), माटेगाव (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (८९), हर्सूल येथील पुरुष (३६), सिल्लोडमधील महिला (६५), हडको भागातील पुरुष (८०), फुलंब्रीतील पुरुषाचा (७०) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

आणखी दीड हजार रुग्ण बरे

औरंगाबाद ८०१ कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील ३२० तर ग्रामीण भागातील ४८१ जणांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ९७७ झाली. बरे झालेल्या आणखी १ हजार ५४७ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ६९६, ग्रामीण भागातील ८५१ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ८९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १० हजार ३०० जणांवर उपचार सुरू आहेत.