Indian Army : अजिंठा गावामध्ये साकारली ‘भारतीय सैन्य’ गाथा; भारतीय सैन्याप्रती आदर, भारत दर्शन वस्तुसंग्रहालयातील मिनिएचर कलाकृती
Bharat Darshan Museum : अजिंठा येथील भारत दर्शन संग्रहालयात भारतीय सैन्याची मिनिएचर कलाकृती टाकाऊ साहित्यापासून तयार करण्यात आली आहे. विष्णू घुले यांनी इतिहास आणि हस्तकलेच्या समृद्धीने या अनोख्या संग्रहालयाची स्थापना केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा गावात भारताचे दर्शन घडवणाऱ्या भारत दर्शन वस्तुसंग्रहालयात नुकतेच भारतीय सैन्याची गाथा बघण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी सर्व साहित्य टाकाऊ असल्या तरी मिनिएचर कलाकृती उत्तम झाली आहे.