
काल सायंकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या भीषण वादळाने सर्वत्र खळबळ उडवली. याच वादळात इंडिगोच्या दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाला मोठा फटका बसला. विमान हवेत असताना जोरदार वाऱ्यांमुळे ते डाव्या-उजव्या बाजूने हेलकावे खाऊ लागले. या थरारक घटनेने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. शेवटी, विमानाला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नाही, आणि वैमानिकाला नाशिकच्या ओझर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली.