आर्थिक विवंचनेतून नवउद्योजकाचा शेवट, मोबदला मिळाला नाही

कृष्णा खंबाट
कृष्णा खंबाट सकाळ

औरंगाबाद : शहरात आर्थिक विवंचनेतून नवउद्योजकासह (Industrialist) एका मजुराने गळफास घेऊन आपली जीवनयात्री संपविल्याची घटना २४ जुलै रोजी घडली. अमोल वैजनाथ पठाडे (२०, रा. दत्तनगर, चिकलठाणा) असे मजुराचे तर कृष्णा नारायण खंबाट (३५, रा. कांचननगर, नक्षत्रवाडी) असे आत्महत्या केलेल्या नवउद्योजकाचे नाव आहे. दत्तनगर भागात राहणारा अमोल हा आईसह मजुरी करून (Crime In Aurangabad) उदरनिर्वाह करायचा. मात्र, काही दिवसांपासून तो दारूच्या आहारी गेला होता. २४ जुलै रोजी त्याची आई मजुरी कामासाठी गेली होती. त्यामुळे अमोल एकटाच घरी होता. ते बराचवेळ होऊनही घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी आत डोकावून पाहिले. तेव्हा अमोलने छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. शेजाऱ्यांनी अमोलला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस नाईक भानुदास खिल्लारे करत आहेत.(industrialist hanged himself due to financial problem in aurangabad crime news glp88)

कृष्णा खंबाट
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

मोबदला न मिळाल्याने संपविले जीवन

तीन वर्षांपूर्वी कृष्णा खंबाट यांनी भागीदारीमध्ये दोघांसोबत चितेगावात (Chitegaon MIDC) छोटी कंपनी सुरु केली होती. लॉकडाऊनच्या काळात कंपनी अडचणीत आल्यावर भागीदारांनी कंपनीचा मोबदला दिला नाही. त्यामुळे कृष्णा हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत सापडले होते. अनेकदा मागणी करूनही भागीदार पैसे देत नव्हते. त्यामुळे कृष्णा हे तणावात होते. त्यातून रात्री नऊच्या सुमारास कृष्णा यांनी स्वयंपाक खोलीतील छताला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर घटनेची माहिती सातारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत कृष्णा यांना घाटीत दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास जमादार लक्ष्मण इथापे करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षांची मुलगी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com