esakal | मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

हमीद अन्सार शेख

मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : एका पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या आजाराला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी (ता.२२) थेरगाव (ता.पैठण) (Paithan) येथे ऐन ईदच्या (Bakari Eid) दिवशी घडली आहे. हमीद अन्सार शेख (रा.रांजणगाव दांडगा, ह.मु.थेरगाव, ता. पैठण) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव दांडगा येथील हमीद अन्सार शेख हा विवाहित तरुण बऱ्याच दिवसांपासून थेरगाव (ता.पैठण) येथे शिंपीचे काम करीत होता. तो मानसिक आजाराने (Mental Illness) अनेक वर्षांपासून त्रस्त होता. त्यातच तो काही घरगुती कारणामुळे गेल्या दोन-चार दिवसांपासून तणावात होता. त्याने बुधवारी (ता.२१) कुणाला काही एक न सांगता (Aurangabad) ईदच्या नमाजनंतर घरात कुणाला काहीही एक न सांगता लिंबगाव फाट्यावरील अवैध दारु अड्डयावर दारुची बाटली घेऊन मद्यप्राशन करुन मोनोसिल नावाचे विषारी प्राशन केले. त्यानंतर त्याने त्याच्या सर्व वर्गमित्रांना आपण विषारी औषध प्यायल्याचे मोबाईल करून सांगितले. (youth committed suicide due to mental illness in paithan tahsil of auangabad glp88)

हेही वाचा: लातुरात रिक्षावर झाड कोसळले अन् रिक्षाचालकाचा मृत्यू

एवढेच नव्हे तर आपण मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा, असा शेवटचा फोनद्वारे संदेशही आपल्या मित्रांना दिला. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला. त्याला थेरगाव येथील ग्रामस्थांनी पाचोडच्या ग्रामीण उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचारानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबादला पाठविले. घाटी (Ghati) रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी (ता.२२) सकाळी त्याचे निधन झाले. दुपारी उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात रांजणगाव दांडगा येथे त्याचे दफन करण्यात आले. यासंबंधी पाचोड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणुन नोंद केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुशांत सुतळे, जमादार किशोर शिंदे करित आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन लहान मुलगे आहे. चिमुकल्या बालकाचे पितृछत्र हरवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

loading image