

Police officials outside a lodge in Latur after detaining an accused institution head in a harassment case.
sakal
मुरुड (ता. लातूर): शाळेत कामानिमित्त आलेल्या महिलेचा संस्थाचालकाने मोबाइल क्रमांक घेतला. त्यावर संपर्क साधून लातूर येथे लॉजवर बोलावले. तिची वाट पाहत तो लॉजमधील खोलीत बसला होता. महिलेऐवजी पोलिसांनीच खोलीचा दरवाजा ठोठावला व त्याला ताब्यात घेऊन येथील पोलिस ठाण्यात आणले. सोमवारी (ता. २३) हा प्रकार घडला.