विमा नाकारणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला बीड ग्राहक आयोगाचा दणका

विमा नाकारणाऱ्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला बीड ग्राहक आयोगाचा दणका
Published on: 
तांत्रिक कारणे सांगून मेडिक्लेम नाकारणाऱ्या इन्शुरन्स कंपनीला बीड ग्राहक आयोगाचा दणका सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ५ ः दरवर्षी न चुकता विम्याचा हप्ता भरायचा आणि ऐन आजारपणात हक्काचे पैसे मागितले की कंपनीने तांत्रिक कारणे देत हात वर करायचे, मग आम्ही सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? माझ्या १४ वर्षांच्या लेकीला रुग्णालयात दाखल करण्याची गरजच नव्हती, असा अजब दावा करत कंपनीने आमचा क्लेम फेटाळला होता. पण ग्राहक आयोगाने कंपनीची मनमानी मोडून काढत आम्हाला खरा न्याय दिला! बीडमधील ॲड. हैदरोद्दीन सय्यद यांच्या या शब्दांतून विमा कंपन्यांच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप आणि न्याय मिळाल्याचे समाधान स्पष्टपणे जाणवते. आरोग्य विमा पॉलिसी वैध असतानाही पोकळ कारणे पुढे करून मेडिक्लेम नाकारणाऱ्या स्टार हेल्थ अलाइड इन्शुरन्स कंपनीला बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलीच चपराक लगावली आहे. कंपनीने सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत, आयोगाने कंपनीला एकूण २८ हजार ५२ रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ----- काय आहे नेमके प्रकरण? बीडमधील ॲड. सय्यद यांनी कुटुंबासाठी ७ लाख २५ हजारांची पॉलिसी घेतली होती. त्यांची १४ वर्षांची मुलगी अलिझा हिच्यावर २३ ते २७ जून २०२३ दरम्यान अपेक्स चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. मात्र, रुग्णालय वगळलेल्या यादीत आहे व दाखल होण्याची गरज नव्हती, असे सांगत कंपनीने १५,५५२ रुपयांचा कायदेशीर दावा नाकारला होता. ------ आयोगाचा ग्राहकाच्या बाजूने निकाल या अन्यायाविरोधात ॲड. सय्यद यांनी आयोगात दाद मागितली. आयोगाचे अध्यक्ष हरीश अडके, सदस्या संगिनी पोळ व सतिका शिरदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कंपनी दावा फेटाळण्याबाबत कोणताही ठोस पुरावा देऊ न शकल्याने, आयोगाने उपचाराचे १५,५५२ रुपये, डेली कॅश २,५०० रुपये आणि मानसिक त्रास व कायदेशीर खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. निकालाची अंमलबजावणी करत विमा कंपनीने दंडासह भरपाईचा धनादेश तक्रारदाराला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com