Inter Caste Marriage : कुटुंब तोडते नाते, कधी हल्ले तर कधी बहिष्कार! आंतरजातीय जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
Human Rights : आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना समाजाचा विरोध, बहिष्कार व हिंसक हल्ल्यांना सामोरे जावे लागते. शासकीय मदत तीन लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : राजने (नाव बदलेले) पाच वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. तेव्हापासून त्यांना दोन्ही कुटुंबांनी दूर केले. शासनाकडून ५० हजार मिळाले, त्यातून संसाराला कशीबशी सुरवात केली; पण जिद्द सोडली नाही.