Financial Crime : १०% मासिक नफ्याचे आमिष दाखवून ‘सनसिद्धी फायनान्शियल सर्व्हिसेस’कडून आठ गुंतवणूकदारांची ३९ लाखांची फसवणूक झाली. क्रांती चौक पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रतिष्ठित भागात राहणाऱ्या आठ ते दहा गुंतवणूकदारांना भरघोस नफ्याचे आमिष दाखवून ३९ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार २३ जानेवारी २०२४ ते २१ मे २०२५ दरम्यान घडला.