
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी इटालियन उद्योगजगताला भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले असून छत्रपती संभाजीनगर आणि दिघी (नवीन मुंबई) येथे विशेष इटालियन विभाग स्थापन करण्याची तयारी दर्शवली आहे. गोयल यांच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर ऑटो हब असलेल्या छत्रपती संभाजीनगरात इटलीतील वाहन उद्योगाची मोठी गुंतवणूक होऊ शकते.