Sambhajinagar News : आयटीआय प्रवेशप्रक्रियाची पहिल्या फेरीतील अंतिम यादी आज होणार जाहीर

अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजित आल्टे यांनी दिली
ITI Admission
ITI Admission sakal media

छत्रपती संभाजीनगर - आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू असून शुक्रवारी (ता.२१) पहिल्या फेरीतील अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अभिजित आल्टे यांनी दिली.

ITI Admission
Chh. Sambhajinagar : शहराचा पाणीपुरवठा १४ तासांनंतर सुरू; पाइपलाइन फुटल्याने अनेक भागांत दोन दिवसांचा खंड

पहिल्या फेरीतील अंतिम यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर होणार आहे. पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे, विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल.

ITI Admission
Chh. Sambhajinagar crime : तोतया ‘पीएसआय’चा अखेर भरला घडा!

अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या उमेदवारांना विकल्प क्र. २ ते १०० मधून जागा वाटप झाली आहे, त्यांची इच्छा असेल तर ते प्रवेश निश्चित करु शकतात.

ITI Admission
Chhatrapati Sambhajinagar Crime : पत्नी शोधून द्या, अन्यथा गाव बंद!

पण असे प्रवेश निश्चित केलेले उमेदवार केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या दुसऱ्या ते चौथ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. यासाठी २१ जुलै ला सकाळी ९ वाजेपासून ५ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दुसरी फेरी २१ जुलै ते २५ जुलै अशी राबविण्यात येणार आहे. तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी प्रसिद्ध करणे, इतर कामांसाठी ३१ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com