
छत्रपती संभाजीनगर : राज्यात कौशल्य विकासाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) यंदा मराठवाड्यातील प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. विभागातील एकूण १४९ आयटीआय संस्थांमध्ये २३ हजार ८० जागा उपलब्ध असताना, पहिल्या गुणवत्ता यादीत केवळ ३ हजार ७१४ जागांवरच प्रवेश निश्चित झाले. ही संख्या एकूण उपलब्ध जागांच्या फक्त २५.३५ टक्के इतकी आहे.