

Illegal Transformers Cause Power Overload in Jalna
esakal
जाफराबाद : खडकपूर्णा प्रकल्पालगत विनापरवाना १०० केव्हीची तीन रोहित्रे बसविल्याने परिसरातील शेतीसाठी असलेला वीजपुरवठा ओव्हरलोड झाल्याने पाच दिवस खंडित झाला होता. ब्रह्मपुरी, कुंभारझरी, खानापूर व हिवरा काबली या गावांतील शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने त्यांनी कंपनीकडे तक्रारी केल्या होत्या.