

Jaikwadi Dam
esakal
पैठण: जूनअखेर केवळ २८ टक्के साठा असलेल्या जायकवाडी (नाथसागर) धरणाला नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला. पाण्याची जोरदार आवक होऊ लागल्याने हे धरण टप्प्याटप्प्याने भरू लागले आणि साठा ९१ टक्क्यांवर गेला. मंगळवारी (ता. चार) सायंकाळी सहाच्या सुमारास धरणाचे अठरा दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू करावा लागला. रात्री अकरा ते १२ च्या दरम्यान विसर्ग वाढवून तो १९ हजार क्युसेक करण्यात आला.