esakal | Auranagabad : जळगाव राष्ट्रीय महामार्ग पाच तास ठप्प
sakal

बोलून बातमी शोधा

traffic jam

जळगाव राष्ट्रीय महामार्ग पाच तास ठप्प

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर शहरालगत असलेल्या सहारे ट्रेड समोर रविवारी (ता.३) सकाळच्या सुमारास खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मालट्रक पलटी झाला. यावेळी मागून येणारे दुसरे वाहनही धडकल्याने रस्त्यावरच वाहने आडवी झाल्याने महामार्गावरील वाहतूक जवळपास पाच तास ठप्प झाली होती. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजिंठ्याकडून सिल्लोडकडे येत असलेली मालट्रक (क्र.एम.एच-४.जीसी-५५७९) चालकाने खड्डा चुकविण्याच्या प्रयत्न केल्यानंतर मालट्रक रस्त्यालगत आडवी झाली. त्यामागून येणारे दुसरे वाहन मालट्रकला धडकून रस्त्यावर आडवे झाले. यामुळे रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघाताने रस्त्याच्या दुतर्फा दुपारी बारा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यानंतर खड्ड्यांमध्ये मुरमाचे भरती करून मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, शहरालगत येणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडले आहे.

या खड्ड्यांमध्ये बांधकाम विभागाच्या वतीने थातूरमातूर पद्धतीने मुरूम टाकण्यात येतो. जळगावकडून शहरात येताना रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा अपघात घडत आहे. परंतु रविवारी झालेल्या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसून, रहदारी मात्र पाच तास ठप्प झाली होती.

loading image
go to top