esakal | वावटळीने केला घात! उमेदीच्या वयात दोघा युवकांनी घेतला जगाचा निरोप

बोलून बातमी शोधा

वावटळीने केला घात! उमेदीच्या वयात दोघा युवकांनी घेतला जगाचा निरोप
वावटळीने केला घात! उमेदीच्या वयात दोघा युवकांनी घेतला जगाचा निरोप
sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : अचानक उठलेल्या वावटळीने समोरचे काहीच दिशेनासे झाले अन् याच गोंधळात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या. या अपघातात दोन युवक जागीच ठार, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी (ता.२०) दुपारी बारा वाजेच्या सुमारास भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरील गारखेडा पाटीजवळ घडली. विशाल कैलास साबळे (वय २०, रा.बरंजळा साबळे, ता.भोकरदन) व विशाल शिवाजी दळवी (वय २१, रा. येवता, ता.जाफ्राबाद) असे या अपघातात मृत युवकांची नावे असून वैष्णवी दगडुबा साबळे (वय ११, रा.बरंजळा साबळे ता.भोकरदन) ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील युवक विशाल साबळे हा वैष्णवी हिच्यासोबत दुचाकीने काही कामानिमित्त गारखेडा देवी मार्गे भोकरदन येथे जात असताना गारखेडा पाटीजवळ अचानक समोरून येणाऱ्या विशाल दळवी याच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक झाली. त्यावेळी अचानक मोठी वावटळ उठली होती. त्यामुळे काडी, कचरा माती उडाल्याने दोघांनाही समोर काही दिसले नाही. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात वैष्णवी साबळे ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिला अधिक मार असल्याने याठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. दरम्यान या घटनेने बरंजळा साबळे व येवता या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.