esakal | अकरानंतर मार्केट बंद, पोलिसांकडून निर्बंधांची कडक अमलंबजावणी

बोलून बातमी शोधा

अकरानंतर मार्केट बंद, पोलिसांकडून निर्बंधांची कडक अमलंबजावणी
अकरानंतर मार्केट बंद, पोलिसांकडून निर्बंधांची कडक अमलंबजावणी
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : शासनाने लागू केलेल्या नवीन निर्बंधांनुसार जालना शहरातील मुख्य मार्केट बुधवारी (ता.२१) सकाळी अकरा वाजेनंतर पूर्णतः बंद करण्यात आले. दरम्यान सकाळी भाजीपाला, किरणा खरेदीसाठी नागरिकांनी मार्केटमध्ये मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. आजघडीला जिल्ह्यात सात हजार १९२ सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे प्रत्येक दिवसाला शेकडो रूग्णांची भर पडत आहे. त्यामुळे राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लाॅकडाउनची जालना जिल्ह्यात आता कडक अमलंबजावणी केली जात आहे.

किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, मास्क विक्री, अंडे विक्री, सर्व खाद्यपदार्थांचे दुकाने, कृषी अवजारे, शेती उत्पादनाशी संबंधीत दुकाने, पाळीव प्राणी, पशुखाद्याची दुकाने (पेट फुड शॉप ), पावसाच्या हंगामासाठी साहित्याची दुकाने हे सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यतच सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर बुधवारी (ता.२१) सकाळी अकरा वाजेनंतर पोलिस प्रशासनाने किराणा, भाजीपाल, फळविक्री, पेट्रोल पंप यासह इतर अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत झालेली गर्दी ओसरल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दरम्यान नागरिकांनी सकाळी किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.