

Jalna District Knife Attack Crime:
sakal
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील पारनेर येथे मुलीला चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने गावातील अठरा वर्षीय पवन संतोष बोराटे याचा चाकू पोटात मारून खून केल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारनेर गावात शनिवारी (ता.24) रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान यातील पवन संतोष बोराटे (वय 18) वर्ष याचा गावातीलच नातेवाईक असलेल्या संशियत मुलीचा भाऊ राहूल उध्दव खरे याने माझ्या बहिणीला चिठ्ठी का दिली अशी विचारणा केली असता यातील फिर्यदीचा मुलगा शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला.