Jalna Crime Update
esakal
Jalna Crime Update : जालना शहरात दिवाळी पाडव्यादिवशी (Diwali Padwa) रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी दुचाकीवरून पाठलाग करत यश मित्तल यांच्या चारचाकी गाडीला अडवले आणि त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढत बेदम मारहाण केली. या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.