

One Dead in Jalna Shooting, Attackers Escape on Motorcycle
Sakal
जालना : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून एकाचा खून केला. शहरातील नूतन वसाहत भागात शुक्रवारी (ता.२३) रात्री साडेआठच्या सुमारास हा थरार झाला. चरण प्रल्हाद रायमल्लू (वय २३, रा. शिवनगर, जालना) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, चरण रायमल्लू याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होते.