Ladki Bahin Yojana in Jalna
esakal
जालना : ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यासह इतर कारणाने जिल्ह्यातील ६० हजार २७२ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. दीड हजार रुपयांचा हप्ता न आल्याने या बहिणींनी (Ladki Bahin Yojana in Jalna) जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. दरम्यान, ई-केवायसीमध्ये चूक झालेल्या महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे.