Chhatrapati Sambhajinagar: व्हीव्हीआयपी लग्नासाठी जालना रोड ठप्प – नागरिक संतप्त; लाडगाव ते करमाड तीन किलोमीटर वाहतूक कोंडी, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

VVIP Wedding Causes Massive Traffic Jam on Jalna Road: छत्रपती संभाजीनगर: लाडगाव येथील हॉटेलमध्ये लग्नसोहळा आणि व्हीव्हीआयपींच्या ‘आशीर्वादासाठी’ पोलिसांनी जालना रोड कोंडून टाकला.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: लाडगाव परिसरातील एका हॉटेलमधील लग्नसोहळ्यानिमित्त आलेल्या व्हीव्हीआयपींच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या `आशीर्वादा`साठी पोलिस, प्रशासनाने जालना रस्ताच कोंडून टाकला! त्यामुळे लाडगाव ते करमाड अशा तीन किलोमीटरपर्यंत रविवारी (ता. तीन) सायंकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. जालन्याकडून येणाऱ्या वाहतुकीला अक्षरशः ब्रेक लागला. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामगारांसह नागरिकांचे हालच हाल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com