

Teachers and Staff's Hunger Strike in Jalna
esakal
जालना : शहरातील संत कबीर उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंगळवार (ता. दहा) पासून विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, संस्थेच्या सचिवांकडून शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वारंवार आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे.