Chhatrapati Sambhajinagar Car Fire: जॅमर लावलेल्या कारला अचानक आग; छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ
Jammer-Fitted Car Catches Fire Near District Court: छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय परिसरात महापालिका आणि पोलिसांनी जॅमर लावलेल्या कारला आग लागली. एका व्यक्तीने सोशल मीडियावरील व्हिडिओत कार पेटवल्याचा दावा केला असून वेदांतनगर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर: एकाने महापालिका आणि पोलिसांकडून जॅमर लावण्यात आलेली कार पेटवल्याची घटना रविवारी (ता.१६) जिल्हा न्यायालय परिसरात घडली. या घटनेची वेदांतनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.