

Women from Jatwada protest outside corporator Ashok Hivrale’s office, demanding a reliable water supply.
esakal
जटवाडा, : निवडणुकीत मत मागायला आलेले नगरसेवक आता पाण्याचा हिशेब देणार का? नळ कोरडे, बोअर आटले, टँकरसाठी ८०० रुपये मोजण्याची वेळ आणि नवीन योजनेचे पाणी अद्याप प्रतीक्षेत! या कोंडीने संतप्त झालेल्या जटवाड्यातील महिलांनी रविवारी (ता. २५) हंडे घेऊन थेट एमआयएमचे नगरसेवक अशोक हिवराळे यांच्या कार्यालयावर धडक दिली. ‘आश्वासन नको, पाणी कधी मिळणार ते सांगा,’ असा सवाल करीत महिलांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला.