ANU26A01201
अणदूर ः अविष्कार संशोधन स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्यवर मार्गदर्शक.
जवाहर महाविद्यालयाला पाच पारितोषिके
अणदूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उमरगा येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या धाराशिव जिल्हास्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत अणदूरच्या जवाहर महाविद्यालयाने पाच पारितोषिके पटकावली. कला विभागात मानसी बसवराज मुळे हिच्या ‘संस्कृत व्याकरणदीपिका उपकरण’ प्रकल्पाला प्रथम, तर विज्ञान विभागात सृष्टी बाबूराव मुळे हिच्या ‘सौर ऊर्जेवर आधारित बाह्य वायू शुद्धीकरण प्रणाली’ प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. दीक्षा दयानंद मुळे, मनीषा तुकाराम लोहार व गायत्री धानप्पा पाटील यांच्या प्रकल्पांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. विद्यार्थ्यांना प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सचिव रामचंद्र दादा आलुरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी अभिनंदन केले.
........................
MMR26A01898
मुरूम ः सावंत कुटुंबीयांकडून गरजू महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
मुरूममध्ये गरजू महिलांना ब्लँकेट वाटप
मुरूम : येथील प्रगतिशील युवा शेतकरी मुकुल सावंत यांची कन्या क्रांती हिचा पहिला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघाचे तालुका उपाध्यक्ष संजय सावंत यांच्या पुढाकारातून गुरुवारी (ता. २४) मुरूम परिसरातील पाच गरजू महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कौटुंबिक आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपत सावंत कुटुंबीयांनी हा उपक्रम राबविला. यावेळी शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होत्या. दुष्काळी परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सावंत कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
......................
UMR26A18682
उमरगा : समाजसेविका शीला सगर यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम दिनानिमित्त वनराईसाठी ठिबक संच, खेळाडूंच्या साहित्यासाठी निधी देण्यात आला.
सामाजिक उपक्रम दिन साजरा
उमरगा : शीला तुकाराम गायकवाड सगर सामाजिक संस्थेच्या वतीने दिवंगत समाजसेविका शीला गायकवाड सगर यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सामाजिक उपक्रम दिन साजरा करण्यात आला. यावेळी ३० विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन, शाळेला पाच पंख्यांची भेट, लाठी असोसिएशनला साहित्य खरेदीसाठी पाच हजार रुपये आणि वाचनालयाला पुस्तकांसाठी पाच हजार रुपयांचा निधी देण्यात आला. डिग्गी येथील वनराईसाठी ठिबक सिंचन संच तसेच क्षयरुग्णांना पौष्टिक आहार किटचे वाटप करण्यात आले. डॉ. दीपक पोकळे, डॉ. सतीश नरवडे, रामकृष्ण बिराजदार, ॲड. दिलीप सगर आदी उपस्थित होते. तुकाराम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
.........
दुष्काळी मदत, दूध दरवाढीची मागणी
उमरगा : दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक व ग्रामीण नागरिक अडचणीत सापडले असून, त्यांना तातडीने शासकीय मदत देण्याच्या मागणीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष संजय वसंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात दूध दरात वाढ करण्याची मागणी करण्यात आली. चारा, पशुखाद्य, औषधे व मजुरीचे दर वाढल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात असल्याचे नमूद केले. तसेच पाणीटंचाई, पिकांचे नुकसान व रोजगार हमीच्या कामांचा आढावा घेऊन जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
.....................................
शेतकरी, विद्यार्थी प्रश्नांवर कळंबमध्ये बैठक
कळंब : वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी यांच्या संवाद दौऱ्यानिमित्त मराठा सेवा संघ व संलग्न कक्षांची नियोजन बैठक झाली. यावेळी कोरडा दुष्काळ, शेतकरी व विद्यार्थ्यांचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी आणि आगामी महाअधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थी परिषदेची जिल्हा व तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करण्याबाबतही विचारविनिमय झाला. बैठकीस मराठा सेवा संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश लडके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हा सचिव प्रा. संजय सावंत, तालुकाध्यक्ष प्राचार्य जगदीश गवळी, प्रा. अरविंद शिंदे, दत्ताभाऊ कवडे महाराज आदी उपस्थित होते.
......................
BMH26A09882
फोटो ओळी
भूम ः जागतिक रेबीज दिनी माणकेश्वर येथे श्वानांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरज गुळमिरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. रामचंद्र खताळ.
माणकेश्वर येथे श्वानांचे लसीकरण
भूम : जागतिक रेबीज दिनानिमित्त माणकेश्वर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात सोमवारी (ता. २८) पाळीव श्वानांचे मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. ‘एकच लस, सुरक्षित जीव’ हा संदेश देत श्वानप्रेमींमध्ये जनजागृती करण्यात आली. पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरज गुळमिरे यांनी वेळेवर लसीकरण केल्यास श्वानांसह त्यांच्या संपर्कातील नागरिकांचेही संरक्षण होते, असे सांगितले. पशुधन पर्यवेक्षक डॉ. रामचंद्र खताळ यांनी पशुधन व श्वानांचे आरोग्य जपण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. यावेळी डॉ. समाधान अंधारे, डॉ. पार्थ राऊत, शेतकरी व श्वानप्रेमी उपस्थित होते. उपक्रमाला प्रतिसाद मिळाला.
.........................
UMR26A18641
येणेगुर (ता. उमरगा) : भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखेच्या उद्घाटनप्रसंगी राजश्री कदम, उमेश सुरवसे व इतर.
भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखेचे उद्घाटन
उमरगा : भारतीय बौद्ध महासभेच्या उमरगा तालुक्यांतर्गत येणेगुर येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात बीएसआय २५ मिशननुसार ग्रामशाखा क्रमांक १२ चे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्रिशरण, पंचशील व बुद्ध-धम्म-संघ वंदना झाली. तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी पंचशील आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी सुधीर कांबळे, ब्रह्मानंद गायकवाड, प्रा. शिवराम अडसुळे, ज्ञानेश्वर बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. राघोबा गायकवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
..........
MKN26A00837
शुभम पवार
कुस्ती स्पर्धेत शुभम पवार जिल्ह्यात प्रथम
माकणी : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत माकणी येथील भारत विद्यालयाचा विद्यार्थी शुभम गजेंद्र पवार याने ८७ किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे त्याची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शुभमने कुस्तीच्या आखाड्यात दमदार कामगिरी करीत जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळविले. या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सचिव पद्माकर हराळकर, सरचिटणीस जनार्दन लिंबाजीराव साठे आणि प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांनी अभिनंदन केले. क्रीडाशिक्षक किशोर पवार व रंजीत इंगोले यांनी त्याला मार्गदर्शन केले. विभागीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
............
BMH26A09909
भूम : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्रज्वल वाघमोडेचा सत्कार करताना शाळेचे पदाधिकारी.
रवींद्र हायस्कूलचा प्रज्वल जिल्ह्यात प्रथम
भूम : रवींद्र हायस्कूलच्या प्रज्वल अशोक वाघमोडे याने जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील ४५ किलो वजनगटाच्या ग्रिको-रोमन प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्वलने उत्कृष्ट कुस्ती कौशल्य व जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळविले. या यशाबद्दल रवींद्र हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव आर. डी. सुळ, मुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, रवींद्र प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण देशमुख व क्रीडाशिक्षक अमर सुपेकर उपस्थित होते.
.......................
GNJ26A01192
गुंजोटी ः प्रथमेश बोळे यांचा सत्कार करताना तलाठी संजय कोकाटे. सोबत पोलिस पाटील नाजेर देशमुख व इतर.
गुंजोटी प्रथमेश बोळे याचे यश
गुंजोटी : येथील प्रथमेश प्रभाकर बोळे याला रशियातील सेक्युलर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या यशाबद्दल गुंजोटी सज्जाचे तलाठी संजय कोकाटे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. प्रथमेशने मिळविलेल्या यशाबद्दल उपस्थितांनी त्याचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलिस पाटील नाजेर देशमुख, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी देशमुख, शाहूराज बोळे, प्रा. तम्मा शेटगार, रत्नकुमार बोळे आदी उपस्थित होते.
..................................
KLL26B10750
कळंब : डिकसळ येथील संत बोधले महाराज विद्यामंदिरात ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करताना विद्यार्थिनी.
डिकसळ येथे ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती
कळंब : तालुक्यातील डिकसळ येथील संत बोधले महाराज विद्यामंदिरात ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन करून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ग्रंथाचे पारायण केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, आध्यात्मिक विचार व संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महादेव महाराज आडसूळ, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, सुरेश टेकाळे, सोपान पवार आदी उपस्थित होते. उपक्रमशील शिक्षक रमेश आंबिरकर यांचा सत्कार करण्यात आला. माधवसिंग राजपूत यांनी आभार मानले.
....................
MMR26A01904
मुरूम ः महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
मुरूम येथे अभिवादन कार्यक्रम
मुरूम : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रीय काँग्रेस व नागरिकांच्या सहभागातून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. युवा नेते सिद्धलिंग हिरेमठ, लखन बोंडवे, पत्रकार मोहन जाधव व संतोष येवले यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, साधेपणा व स्वच्छतेच्या विचारांवर तसेच शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ घोषणेवर प्रकाश टाकला. युवकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. संतोष येवले यांनी सूत्रसंचालन केले. राजकुमार हिरेमठ यांनी आभार मानले. नागरिक, युवक व विद्यार्थी उपस्थित होते.
....................................
PDA26A05561
परंडा ः जिजामाता शाळेत चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
जिजामाता शाळेत बक्षीस वितरण
परंडा : गणेशोत्सवानिमित्त समर्थ तरुण मंडळ, सोमवार गल्ली यांच्या वतीने जिजामाता शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सत्यजित घाडगे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सानवी जगताप, आरव नलवडे, दूर्वा सुतार, शिवश्री मोरे, आफ्रीन पठाण, रिदा पठाण, राजरत्न परिहार, माहेरा काझी, रणजीत तांबिले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष शरद डोरले, उपाध्यक्ष कुणाल पवार, ओंकार वैद्य, गोरख काळे, प्रसाद सुतार आदींनी स्पर्धेसाठी पुढाकार घेतला. यावेळी शिक्षक व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.