

Jayakwadi Dam
esakal
पैठण: जायकवाडी धरणाच्या नाथसागर जलाशयात ९३.९७ टक्के पाणीसाठा झाला असून, धरणात पाण्याची आवक अद्याप सुरू आहे. शनिवारी (ता. ८) सकाळी पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते नाथसागरातील पाण्याचे विधिवत जलपूजन करण्यात आले. गोदामातेला खणा-नारळ व पुष्पहार अर्पण करून ओटी भरण्यात आली. यावेळी ‘गोदामातेचा जयघोष’ करण्यात आला.