
Jayakwadi Dam
sakal
पैठण : नाशिकमध्ये सुरू झालेला मुसळधार पाऊस, तेथील अनेक धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी पुढे सरकत असल्याने आधीच शंभर टक्के भरलेल्या व गेली काही दिवसांपासून सातत्याने विसर्ग सुरू असलेल्या जायकवाडी (नाथसागर) धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन रविवारी (ता. २८) सातत्याने बदलावे लागले.