
पैठण : नाशिक जिल्ह्यातून पाण्याची आवक वाढल्याने येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. धरणाचे एकूण १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उचलून सोमवारी (ता. २५) रात्री आठपासून नऊ हजार ४३२ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.