

Jayakwadi Dam
esakal
पैठण: जायकवाडी (नाथसागर) धरणात ९३.४३ टक्के जलसाठा असून आवक घटल्याने मंगळवारी (ता. ११) रात्री एकपासून गोदावरी नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातून आवक झाल्याने ‘जायकवाडी’ धरण भरले. साठा नियंत्रित ठेवण्यासाठी चार ऑगस्टपासून धरणाचे १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट उघडून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.