Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तील जलसाठा ३६ टक्क्यांवर, गोदावरीला पूर; सतर्कतेचा इशारा

Jayakwadi Dam Water Storage Climbs to 36 Percent: नाशिकमधील मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

esakal

Updated on

पैठण: नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी जायकवाडी प्रकल्पात (नाथसागर) झेपावत आहे. त्यामुळे गेले काही दिवस ३१ टक्क्यांवर स्थिर असलेल्या या प्रकल्पातील पाणीसाठा शुक्रवारी (ता. २४) ३६ टक्क्यांवर गेला. नाशिकला मुसळधार पावसामुळे गोदावरी नदाली महापूर आला. गंगापूर व नांदूर मधमेश्वर धरणांतून पाण्‍याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आज दुपारी बाराला तब्बल ९७ हजार ९८७ क्युसेकने ‘जायकवाडी’त आवक सुरू झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com