

Jayakwadi Dam’s water storage offers relief to Chhatrapati Sambhajinagar city and nearby industrial areas amid drought conditions.
esakal
छत्रपती संभाजीनगर: यंदा जिल्ह्यात दुष्काळस्थिती आहे. पण, शहर आणि लगतच्या औद्योगिक वसाहतींच्या पाण्याची चिंता तूर्त मिटली आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याने तेथील धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरण ९४ टक्क्यांपर्यंत भरले होते. सध्या ऑक्टोबर हीटमुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले असले, तरी त्यानंतरही येत्या जूनअखेरपर्यंत पुरेल एवढा जिवंत पाणीसाठा उपलब्ध राहील. त्यामुळे महापालिका हद्दीसह शहरालगतच्या सर्व औद्योगिक वसाहतींना वर्षभर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केला.