Jaikwadi Floating Solar Project: तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाला चालना; ‘जायकवाडी’वरील उपक्रमासाठी आवश्यक त्या मान्यता प्राप्त
NTPC Green Energy: जायकवाडी जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या १३४२ मेगावॉट क्षमतेच्या तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाला आवश्यक सर्व मान्यता मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातील ऊर्जाक्षेत्रात नवा टप्पा गाठणारा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प ठरणार आहे.
जायकवाडी (ता. पैठण) : जायकवाडी जलाशयावर १३४२ मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेड (एनजीइएल) या ‘एनटीपीसी’च्या उपकंपनीकडून तो राबविण्यात येणार आहे.