Chhatrapati Sambhajinaga News: गळतीमुळे लागला चाचणीला ब्रेक; तिसऱ्या दिवशी २७ मिनिटांत आले १६ किलोमीटरपर्यंत पाणी

Jayakwadi Water Supply Project Overview: जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २,५०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनची चाचणी सुरू असताना गळती आढळल्यामुळे तातडीने पंप बंद करण्यात आला.
Chhatrapati Sambhajinaga News

Chhatrapati Sambhajinaga News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २,७४० कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या २,५०० मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनच्या चाचणीला गुरुवारी (ता. २६) ब्रेक लागला. दुपारी १.१५ ला नाथसागरातील पाणी उपसा विहिरीवरील पंप चालू करण्यात आले. हे पाणी ढोरकीनपर्यंत अवघ्या २७ मिनिटांत १२६६० मीटरवरील स्कोअर व्हॉल्व्हपर्यंत पोचले. मात्र, त्यापुढे चार किलोमीटर अंतरावर पाणी येताच लिकेज असल्याचे समोर आले. त्यामुळे पाणी उपसा बंद करण्यात आला. आता हे लिकेज नेमके कशाचे आहे, याचा शोध घेऊन ते बंद केले जाईल, त्यानंतर पुन्हा चाचणीला सुरवात होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com