पक्ष मजबूतीसाठी जयंत पाटील उद्यापासून मराठवाड्यात

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील पत्रकार परिषदेत बोलताना.
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील पत्रकार परिषदेत बोलताना.
Summary

तुळजापूरात तुळजाभवानीचे दर्शन घेऊन गुरुवारपासून (ता.२४) या संवाद उपक्रमास सुरुवात होईल. या दौऱ्यात आणि संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचाही समावेश असणार आहे.

औरंगाबाद : आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील Nationalist Congress Party State President Jayant Patil हे ता.२४ जून ते ३ जूलै दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात 'राष्ट्रवादी परिवार संवाद' Rashtrawadi Pariwar Sawand हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्व नियमांचे पालन करीत हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील Kailas Patil यांनी बुधवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत दिली. कैलास पाटील म्हणाले की, तुळजापूरात तुळजाभवानीचे दर्शन घेऊन गुरुवारपासून (ता.२४) या संवाद उपक्रमास सुरुवात होईल. या दौऱ्यात आणि संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचाही समावेश असणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा Tuljapur Constituncy आढावा घेतल्यानंतर उस्मानाबादला Osmanabad रवाना होणार आहे. ता.२५ जून रोजी उस्मानाबादेतून जलसंपदा विभागाचा Irrigation Department आढावा घेणार आहे. ता.२६ जूनला ते लातूर Latur, २७ जूनला नांदेड Nanded, २८ जूनला यवतमाळ Yavatmal आणि हिंगोलीचा Hingoli दौरा करणार आहेत. ता.२९ जूनला परभणीचा Parbhani आढावा घेणार आहे. ता.३० जूनला जालना Jalna येथील जिल्ह्याची आढावा बैठक घेणार असल्याचेही श्री.पाटील यांनी सांगितले. jayant patil from tommorrow tour on marathwada for party strenthening

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील पत्रकार परिषदेत बोलताना.
'एमआयएम'चा पहिला महापौर औरंगाबादमधून, इम्तियाज जलीलांना विश्वास

एक जुलैला औरंगाबादचा दौरा

एक व दोन जुलैला 'राष्ट्रवादी परिवार संवाद' उपक्रम औरंगाबाद जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यात दोन जुलैला वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, औरंगाबाद शहरातील तिन्ही मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर ३ जूलैला पैठण मतदारसंघाचा आढावा घेऊन ते बीड येथे जाणार आहे. ४ जुलै बीड जिल्ह्यातील आढावा घेणार आहे, असेही श्री.पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शहाराध्यक्ष विजयराज साळवे, माजी आमदार विजय वाघचौरे, अप्पासाहेब निर्मळ, शेख रफिक, मिर्झा हमीद, मुक्तार खान, सय्यद अजमत उल्ला, बाळासाहेब पाटील, सुहास जोशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले, रवी माहोरकर, सचिन इधाटे, शरद पवार, साईनाथ जाधव, गणेश पवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com