राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही; जयंत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil statement state government not complete the tenure shiv sena politics aurangabad

राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही; जयंत पाटील

औरंगाबाद : शिवसेनेतून गेलेल्या आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी आहे. यामुळे राज्य सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही. आता फक्त भाजपचे अंतर्गत संख्याबळाचे गणित जुळले की, हे सरकार बरखास्त होईल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औरंगाबादेत आज केला. ते म्हणाले, की सरकारमध्ये गेलेले शिवसेनेचे आमदार नाराज आहेत. यासह राज्याच्या प्रशासनालाही कळले आहे की, हे फार दिवसाचे सोबती नाहीत. त्यांचे सरकार कधीही जाऊ शकते. परिणामी सरकारची प्रशासनावरील पकड ढिली झाली आहे.

ज्यावेळी भाजपचे अंतर्गत संख्याबळाचे गणित जुळेल त्याचवेळी हे सरकार बरखास्त होईल. त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्षात येईल की, आपण किती मोठी चूक केली, असा टोलाही पाटील यांनी शिंदे सरकारला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिहिलेली भाषणे वाचतात. त्यांना भाषणाची स्क्रिप्ट कोणीतरी लिहून देत आहे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी एकसंध राहावी

महाविकास आघाडी एकसंध राहावी, अशी आमची प्राथमिकता आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना सहकारी काँग्रेस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांशी बोलावे आणि स्थानिक ठिकाणी आघाडी करावी, अशी सूचना दिल्या आहेत, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Web Title: Jayant Patil Statement State Government Not Complete The Tenure Shiv Sena Politics Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..