कळंबच्या विद्यार्थ्यांचे स्पेलिंग बी स्पर्धेत यश

कळंबच्या विद्यार्थ्यांचे
स्पेलिंग बी स्पर्धेत यश
Published on: 
कळंबच्या विद्यार्थ्यांचे स्पेलिंग बी स्पर्धेत यश कळंब, ता. २१ (बातमीदार) : धाराशिव जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विविध इयत्तांमध्ये पाच प्रथम क्रमांकांसह विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. इंग्रजी शब्दलेखनातील अचूकता, शब्दसंग्रह, भाषिक कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुकास्तरीय स्पर्धेचे नियोजन गटशिक्षणाधिकारी बाळाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. केंद्रप्रमुख, विषय शिक्षक आणि विशेष शिक्षकांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथमेश पाटील, श्रेया केसारे, आरव शेळके, स्वरा गावकरे, समृद्धी टेकाळे आणि संजीवनी वाघमारे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. योगिनी पवार हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सानवी भांडे, शौर्य नांदे, सुहानी कोल्हे आणि समीक्षा तांदळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. डिसेंबरमध्ये होणाऱ्या गणित विषयाच्या परीक्षेसाठी सर्व शाळांनी आतापासून नियोजनबद्ध तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गणितीय संकल्पना स्पष्ट करणे, सराव चाचण्या घेणे आणि केंद्रनिहाय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याच्या सूचना शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com