Road Accident: कन्नड तालुक्यातील सातकुंड गावात शोककळा; परतीच्या प्रवासात झालेल्या अपघातात तरुण चालकाचा बळी
Accident News: धुळे-चाळीसगाव महामार्गावर आयशर वाहनांच्या भीषण धडकेत कन्नड तालुक्यातील २७ वर्षीय चालक सागर चव्हाण यांचा मृत्यू झाला. राजस्थानहून परत येत असताना झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कन्नड : धुळे ते चाळीसगाव महामार्गावर अचानक थांबलेल्या टेंपोवर पाठीमागून येणारा आयशर आदळला. या अपघातात एका आयशर चालक सागर ताराचंद चव्हाण (२७, रा. सातकुंड, ता. कन्नड) याचा मृत्यू झाला.