esakal | कन्नड तालुक्यात तलावात बुडून तरुणाचा मुत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

kannad

कन्नड तालुक्यात तलावात बुडून तरुणाचा मुत्यु

sakal_logo
By
वाल्मिक पवार

चापानेर (जि. औरंगाबाद) : चापानेर (ता.कन्नड) येथील तरुण विशाल चंद्रकांत गायकवाड (वय २८)हा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला ही घटना मंगळवारी (ता.१२) रोजी दुपारी उघडकीस आली. जवळच असलेल्या लाडकू राठोड यांनी तो पाण्यात गटांगळ्या खात पाहिल्यानंतर आरडाओरडा केली असल्याने शेजारी शेतात असलेले पुरुषोत्तम शेलार यांनी त्वरित पाण्यात उडी मारून विशाल यास बाहेर काढले. त्यानंतर विशाल च्या नातेवाईकांना कळवण्यात आल्यानंतर त्याचे वडील, भाऊ आल्यानंतर यांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र चापानेर येथे दाखल केले, मात्र येथील प्रभारी वैद्यकीयअधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा: यंदा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होणार

यानंतर सदरील घटनेची माहिती कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात कळविण्यात आली माहिती मिळताच बीट जमादार गणेश जैन यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यानंतर चापानेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मुतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही वाचा: अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार

त्यानंतर तीन चार वाजेच्या सुमारास चापानेर येथील सार्वजनिक स्माशानभुमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच्या पश्चात आई,वडील,काका, काकू,दोन भाऊ असा परिवार आहे. कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक बालक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गणेश जैन हे करत आहे

loading image
go to top