

Declining Reservoir Levels in Kannad Taluka Prompt Authorities to Reserve Available Water for Drinking
esakal
कन्नड, : तालुक्यातील बहुतांश लघू व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा खालावला आहे. आगामी काळात पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पूर्णा-नेवपूर व अंजना-पळशी या मध्यम प्रकल्पांसह माटेगाव व वडोद या लघू प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, शिवना-टाकळी व अंबाडी या मध्यम प्रकल्पांमध्ये अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, सर्वच जलाशयांतून शेतीसाठी होणारा पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
शिवना-टाकळी मध्यम प्रकल्पात सध्या २७.९६ टक्के तर कन्नड शहरासह १५ गावांची तहान